रेकॉर्डब्रेक सेहवाग; ४३२ चौकार ठोकत गेलला टाकलंय मागे!

आयपीएल 'सीझन ८'मधल्या दहाव्या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा तुफानी ओपनर विरेंद्र सेहवागनं बुधवारी एक मोठा रेकॉर्ड कायम केलाय. 

Updated: Apr 16, 2015, 04:35 PM IST
रेकॉर्डब्रेक सेहवाग; ४३२ चौकार ठोकत गेलला टाकलंय मागे! title=

नवी दिल्ली : आयपीएल 'सीझन ८'मधल्या दहाव्या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा तुफानी ओपनर विरेंद्र सेहवागनं बुधवारी एक मोठा रेकॉर्ड कायम केलाय. 

सेहवागनं धडाकेबाज बॅटींग करत दिल्लीसमोर १६६ रन्सचं टार्गेट उभं करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. यासोबतच, सेहवागनं आपल्या ४७ रन्समध्ये १९ वं सिंगल शॉट मारला आणि याचबरोबर टी-२० क्रिकेटमध्ये आपले ४००० रन्स पूर्ण केले. 

टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून हा रेकॉर्ड करणारा सेहवाग सातवा बॅटसमन ठरलाय. तर वर्ल्ड क्रिकेटमध्ये ४००० पर्यंत पोहचणारा तो २५ वा बॅटसमन ठरलाय. 

इतकंच नाही तर यासोबत सेहवागनं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. सेहवागनं चार फोर ठोकत आयपीएलच्या इतिहासात तो सर्वात जास्त चौकार ठोकणारा खेळाडू बनलाय. 

सेहवागच्या नावावर आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ४३२ चौकार समाविष्ट झालेत. गेलचा रेकॉर्ड तोडत सेहवागनं हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. याबाबतीत, एकही खेळाडू सेहवागच्या पुढे जाऊ शकलेला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.