त्रिनिदाद-टोबॅगो: वेस्ट इंडिजचा 23 वर्षांच्या इराक थॉमसनं फक्त 21 बॉलमध्ये सेंच्युरी मारली आहे. टोबॅगो क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या टी 20 टुर्नामेंटमध्ये त्यानं हे रेकॉर्ड बनवलं आहे. थॉमसच्या 31 बॉलमधल्या नाबाद 131 रनमुळे त्याच्या टीमनं 152 रनचं लक्ष्य फक्त आठ ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
आपल्या या धमाकेदार खेळीमध्ये थॉमसनं 15 सिक्स आणि पाच फोर लगावल्या. टी 20 क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद सेंच्युरी मारण्याचं रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्याच क्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना गेलनं 30 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. तर एबी डिव्हिलियर्सनं 31 बॉलमध्ये सेंच्युरी लगावली आहे.