पुणे : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजला उद्यापासून पुण्यात सुरुवात होत आहे. याआधी कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या टीमला डिवचलं आहे. प्रत्येक सीरिजमध्ये आम्ही पूर्ण तयारी करून उतरतो. प्रत्येक टीम ही आमच्यासारखी तेवढीच आव्हानात्मक असते, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जास्त महत्त्व देणार नाही, असं विराट कोहली म्हणाला आहे.
दरम्यान आगामी टेस्ट सीरिजमध्ये भारताचं स्लेजिंग करा असे आदेश ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं त्याच्या सहकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे या सीरिजमध्ये मैदानातल्या खेळाबरोबरच शाब्दिक खेळही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.