'वंडरबॉय' आदित्यनं ठोकला वन डेमधला 'महारेकॉर्ड'

 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या बॅट्समननं 50 ओव्हरच्या दोन मॅचमध्ये सलग दोन दिवसांत 459 रन्स ठोकलेत. राजस्थानच्या 18 वर्षांच्या आदित्य गढवालनं ही कामगिरी करून दाखवलीय. 

Updated: Oct 24, 2014, 03:53 PM IST
'वंडरबॉय' आदित्यनं ठोकला वन डेमधला 'महारेकॉर्ड'   title=

नवी दिल्ली :  क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या बॅट्समननं 50 ओव्हरच्या दोन मॅचमध्ये सलग दोन दिवसांत 459 रन्स ठोकलेत. राजस्थानच्या 18 वर्षांच्या आदित्य गढवालनं ही कामगिरी करून दाखवलीय. 

ग्रेटर नोएडाच्या युनिव्हर्सिटी ग्राऊंडमध्ये या अंडर-19 क्रिकेट टूर्नामेंट रंगली. मंगळवारी आदित्यनं रेल्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याचा रेकॉर्ड केला. त्यानं नाबाद 18 सिक्स आणि 22 चौकारांसह 263 रन्स  (151 बॉल्समध्ये) ठोकले.

तर बुधवारी मध्यप्रदेशविरुद्ध त्यानं 7 सिक्सर आणि 19 चौकारांसहीत 196 रन्स ठोकले. नंबर 3 वर खेळणाऱ्या आदित्यचा दोन दिवसांत दोन डबल सेन्चुरी बनवण्याचा रेकॉर्ड मात्र थोडक्यात हुकला... पण, त्यानं जितके रन्स ठोकले तेच रन्स एक मोठा रेकॉर्ड ठरलाय.  

'मी एव्हढे रन्स करू शकेन असं मलाही वाटलं नव्हतं... पण, मी हे करून दाखवलं यातच मला आनंद आहे. अजून खूप लांबचा प्रवास करायचाय...' असं आदित्यला त्याची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यानं म्हटलं.   
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.