मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-२० फॉरमॅटसाठी युवराज सिंगने टीममध्ये जबरदस्त कमबॅक केलं आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे युवराज सिंगसाठी टीमचे दरवाजे उघडे झाले. युवराजने 6 एप्रिल 2014 ला श्रीलंकेविरोधात ढाका येथे शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर 1 वर्ष 8 महिन्यांनंतर युवराज हा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरोधात खेळताना मैदानात दिसणार आहे.
11 डिसेंबर 2013 ला दक्षिण आफ्रिकेविरोधात युवराजने शेवटचा वनडे सामना खेळला आहे. त्यानंतर त्याला वनडेत संधी मिळाली नाही. तर 5 ते 9 डिसेंबर दरम्यान तो कोलकाता येथे इंग्लडविरोधात शेवटचा सामन्यात खेळला आहे.
आयपीएलमध्ये युवीने याच वर्षी 17 मे 2015 ला रॉयल चॅलेंजर विरोधात बॅंगलोर येथे अंतिम सामना खेळला आहे.