नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पुनरागमन करणाऱा भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंगला दिल्ली डेअरडेविल्सने मात्र बाहेरचा रस्ता दाखवलाय. आयपीएल ८मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या युवराजला दिल्लीने १६ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
मात्र या आयपीएलमध्ये युवराजची कामगिरी चांगली झाली नाही. त्याने १३ सामन्यांमध्ये केवळ २४८ धावा केल्या होत्या.
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे प्रदर्शनही गेल्या वर्षात चांगले झाले नाही. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादमधूनही त्याची गच्छंती करण्यात आलीये. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला हैदराबाद टीममधून वगळण्यात आलंय. आयपीएल ८ मध्ये स्टेनने हैदराबादमधून सहा सामन्यांमध्ये केवळ तीन विकेट घेतल्या.