www.24taas.com, वॉश्गिंटन
इंटरनेटच्या इतिहासात आजवरचा सर्वात मोठा सायबर अटॅक झाला आहे. इंटरनेटवरील या सायबर अटॅकने जगभरातील इंटरनेटवर परिणाम झालेला आहे.
सायबर अटॅकने जगभरातल्या इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहेच, पण यावर लवकर तोडगा काढला गेला नाही, तर ईमेल आणि बँकिंग सेवा ठप्प होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करण्यात येते आहे.
स्पॅम मेलची यादी करणा-या जिनेव्हातल्या एका संस्थेनं सायबरबंकर ही साईट गेल्या आठवड्यात ब्लॅकलिस्ट केली. त्यानंतर अचानक या संस्थेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक सुरू झालाय.