www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
महिलांवरील वाढते अत्याचार पाहता एका आयटी कंपनीनं सुरक्षेसाठी स्मार्ट अॅप्लिकेशन तयार केलंय. यामुळं हल्ला झाल्यास पुरावा मिळवण्यात मदत होणारेय. सायरन वाजून ठिकाण, फोटो, आवाजाचं चित्रिकरण या अॅप्लिकेशनद्वारं केलं जातं.
आता गर्दीच्या ठिकाणी, वाहनांमध्ये रेल्वेमध्ये अगदी कुठेही महिलांवर काही हल्ला झाला तर त्यांच्या मदतीला त्यांचा मोबाईल फोन पडेल. ‘बी स्मार्ट, बी सेफ’ हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आलंय. ऍलकमे या आयटी कंपनीने हे ऍप्लिकेशन तयार केलंय. अॅप्लिकेशन तयार झाल्यावर सायरन वाजून त्या ठिकाणचा पत्ता, फोटो आवाज चित्रिकरण अॅप्लिकेशन द्वारं केलं जातं. याच कंपनीच्या सर्व्हरवर ही माहिती सेव्ह होणार आहे.
ऍक्टीव्ह मोड, सायलेंट मोड, प्रिवेंटीव्ह मोड, काऊंटडाऊन मोड, ब्रॉडकास्ट मोड असे पाच विविध मोड या अॅप्लिकेशनचे आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मोड बदलू शकता. मोफत असलेलं हे अॅप्लिकेशन गुगल प्लेवरून ‘स्मार्ट सेफ’ नावानं डाऊनलोड करता येणार आहे.
अॅप डाऊनलोड करण्यासाठी - URL|smart-safe.org या वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन करता येणार आहे. ज्यात तु्म्ही रेकॉर्ड केलेला मजकूर तुम्हाला सुरक्षित ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे या दरम्यान तुमच्या मोबाईलला इजा झाली तर रि-रेकॉर्ड सर्व्हरवर तो डेटा सेव्ह होणार आहे.
पोलिसांनी देखील पुराव्यासाठी हे अॅप्लिकेशन उपयोगी पडणार आहे. वाढती गुन्हेगारी पाहता आता महिलांना धाडसी बनून अशा स्मार्ट तंत्राचा वापर करावा लागणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.