५० मेगापिक्सलचा 'फाईंड-७' देणार नोकियाला टक्कर?

स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ठ आणि नवनवीन फिचर्स बाजारात उतरवण्यासाठी मोबाईल कंपन्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झालंय. यामध्येही, कॅमेऱ्याची क्रेझ विशेषत: दिसून येते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 4, 2014, 06:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ठ आणि नवनवीन फिचर्स बाजारात उतरवण्यासाठी मोबाईल कंपन्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झालंय. यामध्येही, कॅमेऱ्याची क्रेझ विशेषत: दिसून येते.

एकीकडे, नुकताच बाजारात दाखल झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एस-५ मध्ये १६ मेगापिक्सल ऑटोफोकस कॅमेऱ्याची सुविधा आहे. दुसरीकडे नोकियाचा ४१ मेगापिक्सलचा `ल्युमिया १०२०` आत्तापर्यंत कॅमेराप्रेमींचा लाडका बनलाय.
१९ मार्च रोजी बीजिंगमध्ये होणाऱ्या `ओप्पो लॉन्च इव्हेंट`मध्ये हा चीनी स्मार्टफोनमेकर ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासहीत स्मार्टफोन उतरवण्याच्या तयारीत आहे. असं जर घडलं, तर `ओप्पो`चा `फाईंड ७` हा स्मार्टफोन सगळ्यात जास्त मेगापिक्सलचा स्मार्टफोन ठरेल. नोकियाच्या ल्युमियाला हा स्मार्टफोन तोडीसतोड उत्तर ठरेल.
`ओप्पो` इव्हेंटची माहिती कंपनीनं नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोतून मिळतेय. १९ मार्च रोजी होणाऱ्या या इव्हेंटमध्ये `फाईंड ७` लॉन्च करण्यात येणार असल्याचं म्हटलंय.
याचसोबत फोर्ड क्लासिक कारचाही एक फोटो पोस्ट करण्यात आलाय. Weibo द्वारे अपलोड केलेला हा फोटो `फाईंड ७` कॅमेऱ्यानं घेण्यात आलाय. ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यातून घेण्यात आलेल्या फोटोची क्वालिटी फोटोतून स्पष्ट दिसून येतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.