www.24taas.com, सिडनी
जगातल्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या गुगलला ऑस्ट्रेलियातील एका न्यायाधिशाने दंड ठोठावला आहे. हा दंड थोडा थोडका नसून २०,८००० डॉलर्स इतका आहे. रुपयांच्या बाबतीत विचार केल्यास १,१४,२८,५६० रुपये इतकी या दंडाची रक्कम होत आहे. एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल गुगलला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असणाऱ्या ६२ वर्षीय मिलार्ड तर्कुलजा यांची २००४ साली गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अजूनही कोर्टात ही केस चालू आहे. मात्र गुगलने आरोप सिद्ध होण्यापूर्वीच आरोपीचा उल्लेख मेलबर्नचे कुख्यात गुन्हेगार असा केल्यामुळे गुगलला हा दंड सुनावण्यात आला आहे.
गुगलकडून यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र जर एखाद्या वेबसाइटवर चुकीची माहिती दिली असेल आणि गुगलवर ती वेबसाइट दिसत असेल, तर गुगल जबाबदार कसं असा युक्तिवाद मांडला गेला होता. गुगलवर इतर वेबसाइट्सची माहिती दिसते. त्यांची गुगल शहानिशा करत नाही.