www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सॅमसंग गॅलक्सी गोल्डन स्मार्टफोन आपल्या किंमतीपेक्षा २२ हजार रुपये कमी किंमतीनं आता विकला जातोय.
ऑक्टोबर २०१३ मध्ये हा फोन भारताच्या बाजारात उतरला होता... त्यावेळी या फोनची किंमत ५१,९०० रुपये इतकी निर्धारीत करण्यात आली होती. आता हाच फोन बाजारात २९,९९९ रुपयांना विकला जातोय. म्हणजेच, या फोनची किंमत तब्बल २१,९०१ रुपयांनी कमी करण्यात आलीय.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, सॅमसंगतर्फे याबद्दलची अधिकृत सूचना अजून दिली गेलेली नाही. परंतु, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट `फ्लिपकार्ट`वर गॅलक्सी गोल्डन हाच फोन २९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर या फोनची किंमत अजूनही ५१,९०० रुपये दाखवण्यात येतेय.
सॅमसंग गॅलक्सी गोल्डन हा फ्लिप स्मार्टफोन आहे ज्यामध्ये दोन डिस्प्ले दिले गेलेत. पाहुयात... या फोनची आणखी वैशिष्ट्ये...
* डिस्प्ले - ३.७ इंच
* १.७ गिगाहर्टझ ड्युएल कोअर प्रोसेसर
* १.५ जीबी रॅम
* ८ मेगापिक्सल कॅमेरा
* १.९ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* ऑपरेटींग सिस्टम - अॅन्ड्रॉईड ४.२
* १६ जीबी इंटरनल स्टोअरेज
* कनेक्टिव्हीटी ऑप्शन - ब्लू टूथ, वाय-फाय आणि जीपीएस/एजीपीएस
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.