www.24taas.com,नवी दिल्ली
जगभरातल्या मोबाईलधारकांसाठी सगळ्यात आवडती असणारी गोष्ट म्हणजे एसएमएस. अर्थात लघुसंदेश. हाच एसएमएस आज २१ वर्षांचा झालाय.
एसएमएस मग तो कोणताही असो. मैत्रीचा, प्रेमाचा, गुड न्यूजचा. एकमेंकांच्या संपर्कात राहण्याचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे एसएमएस. ३ डिसेंबर १९९२ ला मेरी ख्रिसमस हा पहिला पहिला एसएमएस पाठवण्यात आला. १९९८ नंतर मोबाईल कंपन्यांनी दिलेल्या सवलतींमुळं एसएमएसच्या वापराचे प्रमाण वाढलं.
सध्या जगभरातले चार अब्ज लोक एसएमएसचा वापर करतायेत. मात्र ऑफकॉमच्या मते या वर्षी इंग्लंडमध्ये एसएमएसचा वापर करणा-याचं प्रमाण एक अब्जांनी घटलंय.
सोशल नेटवर्किंग साइट्स आणि इन्स्टंट मेसेजिंग सर्विस याचा वाढता वापर यामुळं हे प्रमाण घटल्याचं समोर आलंय.