फेसबुकवर अनफ्रेंड केल्याने मुलाने केला मुलीवर हल्ला

बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 3, 2014, 02:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुझफ्फरपूर
बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.
पिडीत मुलीने सांगितले की, माझे वडील शिक्षक आहेत. ते शिकवणी घेतात. युधिष्ठीर यादव हा शिकवणीसाठी येत होता. त्यानंतर त्याची ओळख झाली. मी त्याची फेसबुक फ्रेंडशीप स्वीकारली. मात्र, तो वाईट हरकत करायचा. काहीवेळा तो वाईट मजकूर पोस्ट करायचा. त्यामुळे मी त्याला माझ्या फ्रेंडलीस्टमधून डिलिट केलं.
फेसबुकवर दोघांच्या गप्पाटप्पा सुरू असताना काही दिवसांनी पिडीत मुलीला युधिष्ठीरसोबतच्या मैत्रीची भीती वाटू लागली. तिनं त्याच्यापासून लांब राहणं पसंत केलं. त्यानुसार तिने त्याला फेसबुकवरही `अनफ्रेंड` केलं. ही बाब समजताच, युधिष्ठीर संतापला. त्यांने तिचा काटा काढण्याचा डाव रचला. त्याने उकळलेलं पाणी घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर फेकलं. यात ती गंभीर भाजली. घटनेनंतर तो पळून गेला. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी छापे मारलेत.
या हल्ल्यानं ही मुलगी भेदरली होती. तिला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती ठिक आहे. अल्पवयीन मुलगा इयत्ता दहावीत शिकत आहे. त्याचे वडील एका सैनिकी शाळेतील निवृत्त शिक्षक आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.