www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गुगलचे वेब ब्राऊजर्स `गुगल क्रोम` आणि `मोजिला फायरफॉक्स` यूजर्समध्ये लोकप्रिय झालेत. पण, हेच वेब ब्राऊजर्स तुम्हाला धोका देऊ शकतात. कारण, यामध्ये अनेक कमजोर जागा आहेत, ज्यामार्फत सायबर हल्ला केला जाऊ शकतो, असं सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटलंय.
यामुळेच, भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये आपल्या कम्प्युटरशी कुणी उलट-सुलट खेळत असताना आढळलं तर त्यावर लगेचच कारवाई करा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिलाय.
व्हायरसचा वेगानं होणारा शिरकाव रोखण्यासाठी तज्ज्ञांनी या वेब ब्राऊजर्सच्या वापरकर्त्यांना ताबडतोब आपल्या कम्प्युटरवर या दोन्ही वेब ब्राऊजर्सला अपग्रेड करण्याचा सल्ला दिलाय. कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पांस टीम ऑफ इंडिया (सीईआरटी-आईएन)नं देशातील ऑनलाईन उपयोगकर्त्यांना हा सल्ला दिलाय. मोजिला फायरफॉक्स, थंडरबर्ड आणि सीमंकीमध्ये अनेक नव्या कमजोर भागांचा ठावठिकाणा लागलाय. सध्याच्या सुरक्षा उपायांना धाब्यावर बसवून दूर बसलेला सायबर हल्लेखोर संवेदनशील डाटाशी खेळू शकतो... तसंच तुमच्या कम्प्युटरला आपल्या ताब्यातही घेऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलंय.
सीईआरटी-आईएन ही भारतीय इंटरनेट जगतातील हॅकिंग, फिशिंग रोखणारी आणि सुरक्षासंबंधी बचावसंबंधी दुरुस्त्या सुचविणारी नोडल एजन्सी आहे. एका सायबर विशेषज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, भारतीय ऑनलाईन उपभोक्त्यांमध्ये दोन्ही वेब ब्राऊजर्स इंटरनेट सर्फिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
तुम्हीही मोजिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम हे वेब ब्राऊजर्स वापरत असाल तर ताबडतोब हे वेब ब्राऊजर्स अपग्रेड करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.