मुंबई : योग गुरू बाबा रामदेव यांना योग प्रशिक्षण देताना तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल पण ते कुस्ती पण खेळतात हे तुम्हांला माहित आहे का. नाही तर मग असाच एक आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पतंजली या संस्थेने योगपीठाची स्थापना करताना अनेक कार्यक्रमांचे आयोजन केला होता, त्यात बाबा रामदेव आणि ६५ किलो वजनाच्या एका कुस्तीपटूची कुस्ती ठेवण्यात आली होती.
या नंतर पतंजली योगपीठात योग गुरू बाबा रामदेव यांच्या कुश्तीचीच चर्चा होत राहिली. पतंजली योगपीठाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कुस्तीचा शुभारंभ बाबा रामदेव यांनी केला. बाबा रामदेव स्वतः कुश्ती लढण्यासाठी तयार झाले.
पाहा हा व्हिडिओ...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.