www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
मराठी अभिनेत्री अलका पुणेवार या मागील आठवड्यापासून बेपत्ता आहेत. अलका पुणेवार यांची गाडी खोपोलीत खोल दरीत आढळली आहे.
अलका पुणेवार या घरी पोहोचल्या किंवा नाही, अशी विचारणा त्यांच्या घरी फोनकरून काही अज्ञातांनी केली आहे. यामुळे अलका पुणेवार यांच्या बेपत्ता प्रकणातलं गूढ आणखीन वाढलं आहे. ठाण्यातील कोपरी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अलका यांचे पती संजय पुणेवार यांनी कोपरी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, पुणेवार यांचा मोबाईल फोनही बंद येत असल्याचं म्हटलं आहे.
ठाण्याहून अलका पुणेवार या २७ डिसेंबर रोजी उरणला एक स्टेज शोसाठी निघाल्या होत्या. मात्र त्यानंतर पुणेवार अद्याप घरी परतलेल्या नाहीत.
महत्वाचं म्हणजे ३० डिसेंबर रोजी अलका यांची गाडी मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळील खोल दरीत आढळली. पण गाडीत अलका यांचा मृतदेह, तसेच गाडीत रक्ताचे डाग नव्हते आणि गाडीचे दरवाजे आतून बंद होते.
घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर अलका यांचा मोबाईल फोन आढळला, मात्र त्यात सिम कार्ड तसेच मेमरी कार्ड नव्हते. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढत चाललं आहे.
बेपत्ता झाल्यानंतर अलका पुणेकर यांच्या घरी लँडलाईनवर एक फोन आला होता. त्यात सेटवर त्यांचं भांडण झालं आणि त्या रागात निघून गेल्या, त्या घरी पोहोतचल्या आहेत का?, अशी विचारणा एका अज्ञाताने केली होती, असं त्यांच्या मुलाने सांगितलं आहे.
अलका पुणेवार यानी गदर, बवंडर, तुझसे लागी लगन या हिंदी तसेच काही मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.