www.24taas.com, रत्नागिरी
`स्टॉक गुरू` या शेअर मार्केट कंपनीच्या नावे लाखो लोकांची फसवणूक करणाऱ्या उल्हास खैरे या महाठगाच्या घरात पोलिसांना अलिबाबाची गुहाच सापडली आहे.
दिल्ली पोलिसांना खैरेच्या रत्नागिरीच्या घरातून मोठं घबाड सापडलंय. खैरेच्या घरातून तब्बल ४० लाखांचे डीडी सापडलेत. शिवाय २२ लाखांचे मोबाईल आणि १७ लाखांची घड्याळंही सापडली आहेत. शिवाय ५० एटीएम आणि डेबिट कार्डही सापडल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीत उल्हास खैरे सिद्धार्थ मराठे या नावानं वास्तव्य करीत होता.
सहा महिन्यांत पैसे दुप्पट देण्याचे आमिष दाखवून देशभरातील तब्बल दोन लाख लोकांना गंडा घालणाऱ्या नागपुरातील या जोडप्याला दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत अटक केली होती.