नवी दिल्ली : नव्या विधेयकानुसार आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही ही रजा लागू होईल.
सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही मातृत्व रजा देण्यासाठी हे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात पारित केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी याबाबत माहिती दिली.
सरकारी कार्यालयांमधल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी सहा महिन्याच्या मातृत्व रजेची तरतूद आहेच. खासगी कार्यालयांमध्ये तीन महिन्यांची मातृत्व रजा दिली जाते. काही महिलांना घरून काम करण्याची मुभाही दिली जावी, अशीही तरतूद या विधेयकात आहे.