www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लग्नाआधी वजन कमी करण्यावर भर दिला तर काहीही वावगं नाही, मात्र वजन कमी करण्याची नियमित चिंता करणेही योग्य नाही, वजन कमी करण्याचे योग्य उपाय काही आहेत, यांचा आधी थोडासा का असेना अभ्यास करणे योग्य आहे.
वजन कमी करण्यासाठी खोट्या जाहिरातींना भुलू नका. आपला योग्य आहार कसा असेल यावर भर द्या, वजन कमी करण्यासाठी एकदम खाणंही बंद करू नका, तेही तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
वजन कमी करण्याचं टेन्शन सर्वात आधी सोडून द्या, सकाळचा नाश्ता वेळेवर घ्या, यामुळे तुमच्या शरीरातील चयापयचय योग्य प्रकारे होऊ शकेल. नाश्त्यात अंड्याचा सफेद भाग, गव्हापासून बनवलेला फॅटस फ्री ब्रेड, ताजी फळं, दहिसोबत बदाम, पोह्यासोबत शक्य झाल्यास इडलीही घ्या.
फॅटसं खाणं टाळा, शांतपणे रोज थोडासा का असेना व्यायाम करा, व्यायाम सुरू ठेवल्याने आपलं वजन कधी कमी होईल हे आपल्याला कळणारंही नाही, मात्र व्यायामात नियमितता आवश्यत आहे.
पोहणे, डान्स सारखे प्रकारही वजन कमी करण्यास मदत करतात. घरात चिप्स, मिठाई, कुकीज आणि चॉकलेट्स ठेऊच नका. तेलाचे पदार्थ प्रकर्षाने टाळा, जिभेवरचं नियंत्रण तुम्हाला वजन कमी करण्यास निश्चित मदत करेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.