'अॅप्पल-१'चा होणार लिलाव...

अपलचा १९७६ साली बनलेला पहिला कम्प्युटर... बिना स्क्रीनचा... थोडासा बेढब... आजच्या आयपॅडबरोबर तर त्याची तुलना होऊच शकत नाही. तरिही, या कम्प्युटरचा जवळजवळ १,८०,००० डॉलरमध्ये लिलाव होऊ शकतो.

Updated: Jun 9, 2012, 04:16 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क

 

१९७६ साली बनलेला 'अॅप्पल'चा पहिला कम्प्युटर... बिना स्क्रीनचा... थोडासा बेढब... आजच्या आयपॅडबरोबर तर त्याची तुलना होऊच शकत नाही. तरिही, या कम्प्युटरचा जवळजवळ १,८०,००० डॉलरमध्ये लिलाव होऊ शकतो.

 

न्यूयॉर्कमध्ये १५ जून रोजी इतिहासात ठळ्ळक अक्षरात आपलं नावं कोरलेल्या या कम्प्युटरचा लिलाव होणार आहे. या कम्प्युटरचं वैशिष्टय म्हणजे १९७६ साली बनलेला हा कम्प्युटर अजूनही काम करतोय.

 

अॅप्पलचे सह-संस्थापक ‘स्टीव्ह वॉज्निएक’ यांनी अप्पल-१ या कम्प्युटरची रचना तयार करून तो हातानं बनवलेला होता. आणि या कम्प्युटरची बाजारात ओळख करून दिली होती, स्टीव्ह जॉब्ज यांनी. ‘सूदबायज’ या लिलाव कंपनीच्या मते हा कम्प्युटर एक दुर्मिळ कम्प्युटर आहे. एका नव्या युगाची सुरुवात या कम्प्युटरनं केली, ज्यामुळे सामान्यांपर्यंत ‘पर्सनल कम्प्युटर’ ही संकल्पना पोहचू शकली. जुलै १९७६ मध्ये पहिल्यांदा हा कम्प्युटर ६६६.६६ डॉलरमध्ये विकला गेला होता.

 

.