झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुलुंडच्या कालीदास नाट्यगृहात वास्तूविराज डॉ. रवीराज अहिरराव यांनी वास्तूशास्त्राविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित केलं होतं. विद्यार्थी किंवा तरुण वर्ग वास्तूशास्त्र या कलेपासून अनभिज्ञ आहे, दूर आहे. त्यांना या कलेची जाण व्हावी, वास्तूशास्त्र म्हणजे काय ते कळावे, वास्तूशास्त्र जागतिक पातळीवर नेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.
वास्तूशास्त्रसारख्या कलेची जोपासना व्हावी यासाठी तरूणांना योग्य मार्गदर्शन मिळावं या हेतूने डॉ. रवीराज अहिरराव यांनी हे शिबीर आयोजित केले होते.
यावेळी या अभ्यासक्रमात महाराष्ट्रभरातून ज्यांनी नैपुण्य मिळवलं आहे त्यांचा सत्कारही करण्यात आला. दरम्यान डॉ. रवीराज अहिरराव यांनी अण्णांच्या आंदोलनाविषयी विचारलं असता त्यांनी य़ा आंदोलनातून राजकारण संपायला हवं अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.