इंटरनेट क्रांती... 3जी, 4जी जुनं झालं, आता येतंय 5जी!

भारतातील बहुतेक नागरिकांकडे अजून नीटसं थ्रीजी आणि फोर जी पोहचलं नसलं तरी इंटरनेटच्या जगतातील क्रांती मात्र एक पाऊल पुढे टाकतेय. 

Updated: Oct 5, 2016, 10:18 PM IST
इंटरनेट क्रांती... 3जी, 4जी जुनं झालं, आता येतंय 5जी! title=

बीजिंग : भारतातील बहुतेक नागरिकांकडे अजून नीटसं थ्रीजी आणि फोर जी पोहचलं नसलं तरी इंटरनेटच्या जगतातील क्रांती मात्र एक पाऊल पुढे टाकतेय. 
 
चीननं जवळपास 100 शहरांत दूरसंचारची पाचवी पिढी अर्थातच 5जी टेक्नॉलॉजीच्या दूरसंचार उपकरणांचं परिक्षण सुरू केलंय. 

हाँगकाँगचं वर्तमानपत्र 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'नं बर्नस्टेन रिसर्चच्या अहवालाच्या आधारावर ही बातमी प्रकाशित केलीय. 

ग्राहकांच्या संख्येच्या दृष्टीनं चीन हा जगातील सर्वात मोठा दूरसंचार बाजार आहे. सेल्युलर फोनमध्ये चीनला आपली घोडदौड कायम ठेवायचीय. चीनमध्ये 1.3 अरब फोन यूजर्सपैंकी 30 टक्के लोक 4जी टेक्नॉलॉजी वापरत आहेत.

'5जी'ची वैशिष्ट्यं...

सध्या वापरात असलेल्या 4जी टेक्नॉलॉजीच्या तुलनेत 5जी टेक्नोलॉजी ही 20 टक्क्यांनी तेज असेल. यामध्ये 'डेटा लॉस' अगदी नाममात्र राहील. 5जी टेक्नॉलॉजीच्या परिक्षणासोबत अधिक उपभोक्ते आणि हायस्पीड डेटामध्ये सक्षम अॅन्टीना प्रणालीचंही परिक्षण करण्यात येतंय, असं अहवालात नमूद करण्यात आलंय.