मुंबई : गुगल वापरणाऱ्या नव्या पिढीतील अनेकांना आरके नारायण यांचं नाव ठाऊक नसेल, आरके नारायण हे एक ख्यातनाम लेखक आहेत, त्याचं मालगुडी डेज नावाचं एक पुस्तक होतं, यात त्यांनी 'मालगुडी' हे त्यांच्या स्वप्नातलं गाव वसवलंय.
नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर एक मालिका प्रसारीत होत होती, मालगुडी डेज. या मालिकेत प्रत्येक दिवशी मालगुडी नावाच्या काल्पनिक गावावर आधारीत एक कहाणी होती, यातील प्रत्येक कहाणी रंजक होती.
मालगुडी डेजमधील कॅरेक्टर लोकं आजही विसरलेले नाहीत. या मालिकेचा मुलांवर खूप प्रभाव दिसून आला. ही मालिका हिंदी आणि इंग्रजीत बनवण्यात आली होती.
आरके नारायण यांचा आज १०८ वा जन्मदिवस आहे, या निमित्ताने गुगलने डुडल बनवून आरके नारायण यांना श्रद्धांजली दिली आहे.
अनेक वर्षानंतरही मालगुडी डेजच्या कहाण्या तेवढ्याच लोकप्रिय आहेत, हेच यात विशेष आहे. गाईड या कादंबरीसाठी त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, गाईड या कादंबरीवरील सिनेमाही प्रचंड लोकप्रिय झाला.
या मालिकेत स्वामी ऍण्ड फ्रेण्डस आणि वेंडर ऑफ स्वीट्स सारख्या लहान कथांचा समावेश होता. दूरदर्शनवर मालगुडी डेजचे एकूण ३९ भाग प्रसारीत झाले. या मालिकेत दाखवण्यात आलेले चित्र आरके नारायण यांचे भाऊ आणि सुप्रसिद्ध कार्टुनिस्ट आरके लक्ष्मण यांनी तयार केलं होतं.
नारायण यांचं पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी होतं. त्याचं नावं इंग्रजी साहित्यातील महान कादंबरीकारांमध्ये घेतलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.