...इथे 'आयफोन 6' मिळतोय केवळ 9,990 रुपयांना!

आयफोनचे तुम्हीही चाहते असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलंय. 

Updated: Jan 5, 2017, 02:56 PM IST
...इथे 'आयफोन 6' मिळतोय केवळ 9,990 रुपयांना! title=

मुंबई : आयफोनचे तुम्हीही चाहते असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलंय. 

'फ्लिपकार्ट'वर तुम्ही आयफोन 6 चा 16 जीबी मॉडेल केवळ 9990 रुपयांना खरेदी करू शकाल. हा आयफोन केवळ करड्या रंगात उपलब्ध असेल. 

फ्लिपकार्टवर आयफोन 6 च्या 16 जीबी मॉडलवर 22 हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काऊंट मिळतोय. सोबतच 5000 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंटही दिला जातोय. त्यामुळे, या डिस्काऊंटसहीत 36,990 रुपयांचा हा फोन केवळ 9,990 रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकेल. 

इतकच नाही तर अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना आणखी 5 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. 

शिवाय तुम्ही आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसच्या सर्व मॉडेल्सवर एक्सचेंज ऑफरमध्ये 20 हजार रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.