मुंबई : इंटरनेट क्षेत्रातील सुप्रिद्ध कंपनी गूगलने सर्वांसाठी मोठी ऑफर ठेवली आहे. पुनर्वापरयोग्य ऊर्जा बनवण्याची पद्धत विकसित करणाऱ्याला 10 लाख डॉलर, म्हणजेच 6 कोटी रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
गुगलने इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक्ल एँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर्ससोबत लिटल बॉक्स चॅलेंज सुरू केला आहे. यानुसार एक किलोवॅट क्षमतेचा वीजेचा इन्वर्टर तयार केला आहे. हे उपकरण सौर उर्जा आणि अक्षय उर्जेला वीजेत रूपांतरीत करणार आहे, ज्याचा घरात आणि वाहनांमध्ये वापर होऊ शकणार आहे.
यात खरं आव्हान असं आहे, हे नवं उपकरण लहान लॅपटॉपच्या आकाराचं असावं, म्हणजे सध्याच्या आकाराचा दहावा भाग, गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे.
कंपनीच्या मते असं उपकरण तयार झालं, तर भविष्यात होणाऱ्या वीजेची कमतरता कमी करण्यास मदत होईल. ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.