इंटेक्सचा थ्रीजी सपोर्टिव्ह स्वस्त आणि मस्त फोन...

भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्स लवकरच आपला एक स्वस्त आणि मस्त फोन बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. या फोनचं नाव आहे 'एक्वा व्ही 5'... इंटेक्सच्या वेबसाईटवर सध्या हा फोन पाहायला मिळतोय.

Updated: Sep 1, 2015, 01:03 PM IST
इंटेक्सचा थ्रीजी सपोर्टिव्ह स्वस्त आणि मस्त फोन...  title=

मुंबई : भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्स लवकरच आपला एक स्वस्त आणि मस्त फोन बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. या फोनचं नाव आहे 'एक्वा व्ही 5'... इंटेक्सच्या वेबसाईटवर सध्या हा फोन पाहायला मिळतोय.

अधिक वाचा - ब्लॅकबेरीचा पहिला अँड्रॉइड स्लाइडर वेनिसचे फोटो आणि डिटेल्स लीक

अधिक वाचा - अनहॅकेबल, अनब्रेकेबल आणि वॉटरप्रुफ फोन

या फोनच्या किंमतीच्या मानाने यात बऱ्यापैंकी फिचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ड्युएल सिमची सुविधा देण्यात आलीय. शिवाय अॅन्ड्रॉईड किट कॅट ऑपरेटिंग सिस्टम यात वापरण्यात आलंय. सिंगल कोअर प्रोसेसर यामध्ये वापरण्यात आलाय. 

'एक्वा व्ही 5'ची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये... 

  • प्रोसेसर : 1 गिगाहर्टझ सिंगल कोअर

  • रॅम : 256 एमबी

  • इंटरनल मेमरी : 16 जीबी

  • डिस्प्ले : 3.5 इंच (320 X 480) HVGA TFT

  • कॅमेरा : 2 मेगापिक्सल, फ्लॅशसहीत

  • फ्रंट कॅमेरा : ०.३ मेगापिक्सल

  • ऑपरेटिंग सिस्टम : अॅन्ड्रॉईड ४.४.२ किटकॅट

  • बॅटरी : १,१०० मेगाहर्टझ

  • कनेक्टिव्हिटी : थ्रीजी, जीपीआरएस/ EDGE, वायफाय ८०२.११, मायक्रो यूएसबी, ब्लू टूथ

इंटेक्सचा हा फोन थ्रीजी सपोर्टिव्ह आहे. या फोनची किंमत आहे फक्त 2,825 रुपये... येत्या काही आठवड्यांत हा फोन बाजारात उपलब्ध होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.