नवी दिल्ली: चीनची स्मार्टफोन कंपनी वन प्लस भारतीय बाजारात आपले पाय पसरू लागलीय. मात्र दिल्लीतील अंकुर दुगर यांच्यासाठी हा फोन जीवघेणा ठरू शकला असता. चार्जिंग करतांना त्यांच्या स्मार्टफोनचा स्फोट झाला, तेव्हा ते झोपलेले होते.
आणखी वाचा - Important: इमर्जन्सी असतांना लॉक न उघडता स्मार्टफोनमध्ये अशी दिसेल माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी रात्री अंकित फोन चार्जिंगला लावून झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता जेव्हा ते उठले तेव्हा काही तरी जळाल्याचा वास येत होता. त्यांना दिसलं त्यांचा नवीन फोनचा स्फोट झालाय आणि त्यातून धूर निघतोय. आपल्या फोनचा फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय.
कंपनीनं म्हटलं फोन रिप्लेस करून देणार
फोटो पाहून आपण कल्पना करू शकतो की, बॅटरीचा किती जोरात स्फोट झाला असेल. फोनचा मागील भाग पूर्णपणे जळालाय. तर पुढे स्क्रीनवर मोठा डाग पडलाय. अंकुरनं जेव्हा वनप्लसच्या कस्टमर केअरला फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं, सर्व्हिस सेंटर जा, जर रिप्लेसमेंट सारखी परिस्थिती असेल तर फोन रिप्लेस केला जाईल.
आणखी वाचा - ब्लॅकबेरीचा पहिला अँड्रॉइड स्लाइडर वेनिसचे फोटो आणि डिटेल्स लीक
अंकुर आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की, यात त्यांचा जीवही गेला असता. कंपनी मात्र फोन बदल्याचं बोलतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.