मुंबई : दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड या सरकारी आस्थापनेमध्ये अधिकार्यांची ५०९ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
२१ ते ३० वयोगटातील उमेदवार ११ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतींद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी http//newindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी किंवा एम्प्लॉयमेंट न्यूज या वृत्तपत्रात ११ ऑक्टोबरला यासंदर्भातील जाहिरात पाहावी. मराठी तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.