नोकरी : सशस्त्र दलात नोकरीची संधी

दिल्ली पोलीस आणि सशस्त्र दलात पदवीधरांना उपनिरीक्षक होण्याची संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २१९७ जागा आणि दिल्ली पोलीस निरीक्षकमध्ये १३१ जागा आहेत. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एएसआयच्या ५६४ जागा आहेत. दिल्ली पोलीस दलात सर्व जागा पुरुष वर्गासाठी आहेत.

Updated: Mar 22, 2014, 08:38 AM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, दिल्ली
दिल्ली पोलीस आणि सशस्त्र दलात पदवीधरांना उपनिरीक्षक होण्याची संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २१९७ जागा आणि दिल्ली पोलीस निरीक्षकमध्ये १३१ जागा आहेत. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एएसआयच्या ५६४ जागा आहेत. दिल्ली पोलीस दलात सर्व जागा पुरुष वर्गासाठी आहेत.
पात्रता
इच्छूक उमेदवारांच कमाल वय १ जानेवारी २०१४, रोजी २५ वर्ष तर किमान २० वर्ष असणे आवश्यक आहे. एससी-एसटी उमेदवारांना ५ आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची सूट देण्यात आलीय. शैक्षणिक पात्रता कोणतही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. दिल्ली पोलीस पदासाठी अर्ज करणाऱ्यांना चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१४ आहे. तर ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०१४ आहे. अधिक माहिती आणि प्रवेश अर्जासाठी लॉग ऑन करा स्टाफ सेलेक्शन कमीशनच्या http://ssconline.nic.in/ या संकेतस्थळावर...पहिला दोन टप्पात लेखी परीक्षा घेण्यात येईल. शारीरिक चाचणीनंतर मुलाखती होईल. पेपर-१ ची परीक्षा २२ जून, २०१४ रोजी आणि पेपर-२ ची परीक्षा २१ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.