www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रात मोदी सरकार आल्यावर युवा पिढीसाठी नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. मोदी सरकार येत्या 100 दिवसात सरकारी कार्यालयामध्ये असलेले रिकामी पदे भरणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार पुढच्या एका वर्षाच्या आत कमीत कमी एक लाखाहून अधिक सरकारी नोकरीतील रिकाम्या जागा सरकार भरतील. डिपार्टमेंन्ट ऑफ पर्सनल अॅन्ड ट्रेनिंग (डीओपीटी)ने सर्व मंत्रालय आणि विभागातील रिकाम्या असलेल्या पदांची आकडेवारी 15 जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मागितली आहेत.
त्यानंतर लगेच ती पद भरण्याचं काम केले जाईल. यासाठी कामसाठी मोदी सरकारने व्हॅकन्सी मॉनिटरिंग सिस्टीम देखील बनवली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसससी)च्या पदवीधर होणाऱ्या परिक्षेसाठी देखील संधी असतील.
ही परिक्षा एप्रिलमध्ये होणार होती परंतू, लोकसभा निवडणूकीमुळे ती रद्द करण्यात आली होती, येत्या ऑगस्टमध्ये होणाच्या शक्यता आहे. सूत्रांनूसार, यात 30 हजारहून जास्त जागा भरण्यात येतील. तसेच रिअल इस्टेट मध्येही युवकांचे अच्छे दिन मोदी सरकार आणणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.