दिवाळी धमाका : 99 रुपयांत मोबाईल, 6499 रुपयांत लॅपटॉप

फेस्टिव्ह सीझन ऑनलाईन शॉपिंग मार्केटसाठी काही नवी आव्हानं उभी करतं... आणि यामध्ये ग्राहकांचा बराच फायदाही होतो... यंदाच्या दिवाळीतही ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

Updated: Oct 29, 2015, 01:42 PM IST
दिवाळी धमाका : 99 रुपयांत मोबाईल, 6499 रुपयांत लॅपटॉप

नवी दिल्ली : 'ओव्हरकार्ट' या वेबसाईटनं जाहीर केलेल्या 'ओव्हर द टॉप' हा आपला तीन दिवसांचा सेल जाहीर केलाय. आज हा सेल सुरू होताच या वेबसाईटवर ग्राहकांच्या उड्याच पडल्यात... त्यामुळे, हे वेबसाईटही काही वेळ डाऊन झालीय.

फेस्टिव्ह सीझन ऑनलाईन शॉपिंग मार्केटसाठी काही नवी आव्हानं उभी करतं... आणि यामध्ये ग्राहकांचा बराच फायदाही होतो... यंदाच्या दिवाळीतही ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

www.overcart.com या ऑनलाईन कपंनीनं एक सेल जाहीर केलाय. यामध्ये ग्राहकांना केवळ 99 रुपयांत मोबाईल आणि 6499 रुपयांत लॅपटॉपही उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये शाओमी, मोटोरोला, आसूस यांसारख्या कंपन्यांचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. 

'ओव्हरकार्ट'चा हा तीन दिवसांचा सेल 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील. यूझर्सना नोटिफिकेशन्स प्राप्त करण्यासाठी अगोदर या वेबसाईटवर रजिस्टर करणं गरजेचं असेल.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.