नवी दिल्ली : ‘डिजिटल इंडिया‘च्या ब्रँड ऍम्बेसिडरपदी इंदूर आयआयटीमधील टॉपर कृती तिवारीची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ‘डिजिटल इंडिया‘ एक आहे.
‘डिजिटल इंडिया‘चा संदेश देशभर पोचविण्यासाठी कृती भारत भ्रमण करणार आहे. ‘डिजिटल इंडिया‘च्या पुढील वर्षभरातील कार्यक्रमांमध्ये कृती पंतप्रधान मोदींसोबत काम करणार आहे.
कृती म्हणाली, की माझी निवड झाल्याने मी खूप आनंदी आहे. केंद्र सरकारच्या एवढ्या मोठ्या योजनेची मी ब्रँड ऍम्बेसिडर होईल, असा विचारही मी केला नव्हता.
पंतप्रधानांना या योजनेसाठी युवाची गरज होती. ई-लॉकर, ई-स्कॉलरशिप इत्यादी गोष्टी एक युवाच देशभरात योग्य पद्धतीने पोचवू शकतो, असे त्यांना वाटले. मी माझ्या पद्धतीने याबाबतची माहिती देशभरात देईल.
मोदींनी एक जुलैला 'डिजिटल इंडिया' कार्यक्रमाची घोषणा केली होती. यावेळी पंतप्रधानांनी उद्योजकांनी या क्षेत्रात तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांची आणि १८ लाख हातांना काम देणाऱ्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.