पूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!

फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.

Updated: Oct 16, 2014, 06:00 PM IST
पूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’! title=

न्यूयॉर्क : फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... 'हाऊ डिड यू डाय इन युअर पास्ट लाईफ?' असं या गेमचं नाव आहे.

सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.

तुम्हाला या गेममध्ये आठ प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. उत्तरं मिळाल्यानंतर त्याआधारे उत्तरं तयार केली जातात. हे प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही स्वतःला कोणत्या रूपात पाहायला आवडेल. उदारणार्थ शिक्षक प्रेमिका, नेता किंवा सैनिक असे पर्याय दिले जातात. तुमचा देवावर विश्वास आहे का? असे प्रश्न विचाले जातात. पुढील टप्यात तुम्हाला  पैशात मिळालेला बोनस तुम्ही कशा पद्धतीनं खर्च कराल? यासाठी तुम्हाला पाच पर्याय दिले जातात. त्यापुढे लहान मुलांबद्दल प्रश्न विचाले जातात. यासाठी तीन फोटो दाखविले जातात. या तीनपैंकी एक फोटो निवडल्यानंतर तुम्हाला नियम तोडायला आवडेल की त्याचे पालन करायला? हे परिस्थितीवर अवलंबून राहतं.

शेवटच्या आठव्या प्रश्नासाठी तुम्हाला १ ते ८ संख्या निवडावी लागते. तुम्ही या गेममध्ये दिलेल्या उत्तराच्या आधारावर पूर्व जन्मामध्ये तुमच्या मृत्यूचे कारण आणि जागा तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर दिसते.

 

हा खेळ तुमचे मनोरंजन करतोच पण त्याचबरोबर या खेळात तुम्हाला मजाही येते. मग, तुम्हालाह आता जाणून घ्यायचंच असेल की, पूर्वजन्मात तुमचा मृत्यू कधी, कसा आणि कुठे झाला...?  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.