९५ टक्के अॅन्ड्रॉईड मोबाईल्सना हॅकिंगचा धोका!

तुम्हीही अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. गूगलचं ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अॅन्ड्रॉईडमध्ये आढळलेल्या एका मोठ्या चुकीमुळे जगातील जवळपास ९५ टक्के मोबाईल्सना हॅकिंचा धोका निर्माण झालाय. 

Updated: Jul 29, 2015, 02:21 PM IST
९५ टक्के अॅन्ड्रॉईड मोबाईल्सना हॅकिंगचा धोका! title=

नवी दिल्ली : तुम्हीही अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. गूगलचं ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अॅन्ड्रॉईडमध्ये आढळलेल्या एका मोठ्या चुकीमुळे जगातील जवळपास ९५ टक्के मोबाईल्सना हॅकिंचा धोका निर्माण झालाय. 

सुरक्षा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हॅकर केवळ एक मॅसेज पाठवून तुमचा अॅन्ड्रॉईड फोनचं नियंत्रण मिळवू शकतात. मग हा मॅसेज तुम्ही वाचण्यासाठी ओपन केला असो वा नसो... हॅकिंगपासून तुम्ही त्याला वाचवू शकणार नाहीत.

गूगलनं स्टेजफ्राइट मल्टिमीडिया प्लेबॅक इंजिनमध्ये समोर आलेल्या या चुकीला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलाय. पण, २०१२ च्या जेलीबीनच्या अगोदरचं व्हर्जन असलेल्या अॅन्ड्रॉईड फोन्स वापरणाऱ्या अनेक यूजर्सना याचा पटका बसू शकतो. 

गूगलनं २०१० मध्ये अॅन्ड्रॉईड २.२. व्हर्जन लॉन्च करताना स्टेजफ्राईटला बाजारात उतरवलं होतं. या स्टेजफ्राईटचं प्रोग्रामिंग कोड पुरता सुरक्षित नव्हता. त्यामुळेच ही हॅकिंगची समस्या निर्माण झालीय. 

परंतु, अद्याप कोणत्याही मोबाईलला हा धोका उद्भवला नसल्याचं गूगलनं स्पष्ट केलंय. या वायरलाही गूगलनं 'स्टेजफ्राइट बग' असं नाव दिलंय. 

अॅन्ड्रॉईडच्या लेटेस्ट व्हर्जनला हा धोका अद्याप नसला तर किटकॅट आणि लॉलीपॉप या व्हर्जनमध्येही काही तक्रारी आढळल्यात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.