सॅमसंगचा स्वस्त 'अॅन्ड्रॉईड' स्मार्टफोन भारतात...

'गॅलक्सी स्टार 2 प्लस' भारतात लॉन्च झालाय. महत्त्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन अँन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. 

Updated: Jul 29, 2014, 12:47 PM IST
सॅमसंगचा स्वस्त 'अॅन्ड्रॉईड' स्मार्टफोन भारतात... title=
गॅलक्सी स्टार 2 प्लस

मुंबई : 'गॅलक्सी स्टार 2 प्लस' भारतात लॉन्च झालाय. महत्त्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन अँन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. 

सॅमसंग गॅलक्सी स्टार 2 प्लस ड्युएल सिम सपोर्ट करतो. यामध्ये, 480 X 800 मेगापिक्सल रिझॉल्युशनचा 4.3 इंचाचा डिस्प्ले आहे. 1.2 गीगा हर्टझ ड्युएल कोअर प्रोसेसर आणि 512 एमबी रॅम यामध्ये उपलब्ध आहे.  

या स्मार्टफोनच्या मागच्या बाजुला एलईडी फ्लॅशसहीत 3 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पण, या मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही. 

या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी इंटरनल स्टोअरेज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्यानं या फोनची मेमरी 32 जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते. 

कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये थ्रीजी, वाय-फाय, ब्लू टूथ आणि जीपीएसचा समावेश आहे. 138 ग्रॅम वजनाच्या या स्मार्टफोनची लांबी, रुंदी आणि जाडी अनुक्रमे 129.7 X 65.9 X 9.4 मिलीमीटर आहे. 

या फोनमध्ये 1800 mAH बॅटरी देण्यात आलीय. हा स्मार्टफोन केवळ काळा आणि सफेद अशा दोन रंगांत उपलब्ध आहे.  

कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवर या स्मार्टफोनची किंमत 7335 रुपये आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.