सोनीचा ३ जीबीचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च

जपानची स्मार्टफोन निर्माती कंपनी सोनीनं 'एक्सपेरिया झेड 3 प्लस' हा स्मार्टफोन ग्लोबली लॉन्च केलाय. 

Updated: May 27, 2015, 04:27 PM IST
सोनीचा ३ जीबीचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च title=

नवी दिल्ली : जपानची स्मार्टफोन निर्माती कंपनी सोनीनं 'एक्सपेरिया झेड 3 प्लस' हा स्मार्टफोन ग्लोबली लॉन्च केलाय. 

सोनीनं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 'एक्सपेरिया झेड 3' या स्मार्टफोनचं अपग्रेडेड वर्जन आहे. 'एक्सपेरिया झेड 3 प्लस'मध्ये 5.2 इंचाची 1080 पिक्सल डिस्प्ले देण्यात आलाय. 

पिक्चर क्वॉलिटी वाढविण्यासाठी यामध्ये सेन्सरही देण्यात आलेत. हा कमी प्रकाशातही चांगली क्वालिटीचा फोटो क्लिक केला जाऊ शकतो. 

'एक्सपेरिया झेड 3'प्रमाणेच हा स्मार्टफोनही वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. त्यामुळे पावसात भिजण्याची चिंता नाही. कंपनीनं या मोबाईलच्या किंमतीचा खुलासा मात्र अद्याप केलेला नाही.

'एक्सपेरिया झेड 3 प्लस'ची वैशिष्ट्यं... 

  • ऑपरेटिंग सिस्टम : अॅन्ड्राईड 5.0 लॉलीपॉप 

  • स्क्रीन : 5.2 इंच की फूल एचडी  (1080 X 1920 पिक्सल)

  • डायमेंन्शन : 146 X 72 X 6.9 MM

  • वजन : 144 ग्रॅम 

  • फ्रेम : मेटल फ्रेम

  • रॅम : 3 जीबी 

  • प्रोसेसर : 64 बिट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 810 ऑक्टाकोर प्रोसेसर

  • कॅमेरा : 20.7 मेगापिक्सल (ऑटोफोकस) 

  • फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सल

  • बॅटरी : 2,900 मेगाहर्टझ् 

  • इनबिल्ट स्टोअरेज : 32 जीबी (मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 128 जीबीपर्यंत एक्स्पान्डेबल मेमरी)

  • इतर फिचर्स : फोरजी LTE आणि NFC , हाय रिजॉल्युशन ऑडिओ, LDAC कम्प्रेशन टेक्नॉलजी 

  • रंग : ड्युएल ब्लॅक, व्हाईट, कॉपर आणि अॅक्वा ग्रीन 

 

व्हिडिओ पाहा :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.