मुंबई: व्हिवोनं 9,450 रुपयांमध्ये 4G स्मार्टफोन Y31L लॉन्च केला आहे. ड्युअल सिम असलेला हा फोन पांढऱ्या आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
अँडरॉईड 5.1 बेस्ड FunTouch OS 2.1 वर चालणाऱ्या या स्मार्टफोनला 4.5 इंचाची एचडी स्क्रीन आहे. या फोनमध्ये 1.2 GHz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आहे. तसंच 1 जीबी रॅमबरोबर 16 जीबी इंटरनल मेमरी या फोनमध्ये आहे. मायक्रो एसडी कार्ड टाकून 128 जीबीपर्यंत या फोनची मेमरी वाढवता येणार आहे.
या फोनमध्ये एलईडी फ्लॅशबरोबर 8 मेगापिक्सलचा रियर आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या कॅमेरातून एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं फिचर आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत, ज्यात 3G,4G,Edge/GPRS, ब्ल्यूटुथ, वायफाय, मायक्रो यूएसबी आणि एफएम रेडियोचा समावेश आहे. या फोनची बॅटरी आहे 2200mAh
व्हिवोच्या या फोनला भारतामध्ये रेडमी नोट 3 आणि K5प्लस या स्मार्टफोनकडून जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता आहे. पण रेडमी नोट 3 चे लूक्स आणि फिचर्स या फोनपेक्षा चांगले आहेत.