नवी दिल्ली : ब्राझील देशांत मेसेजिंग अॅप्लिकेशनचे अॅक्सेस बंद करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ही सर्व्हिस बंद करण्याचे आदेश न्यायाधीशांकडून सर्व लोकल फोन कंपन्यांना देण्यात आलेत. एका सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आलेक.
ब्राझीलच्या एका फोन कंपनीने SindiTelebrasil’ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप टेक्स्ट मेसेज आणि स्मार्टफोन्ससाठी इंटरनेट व्हॉईस टेलिफोन सर्व्हिस बंद करण्याचे आदेश दिलेत.
कम्युनिकेशन टूल व्हॉट्सअॅपचे अॅक्सेस ब्लॉक करण्याच्या कोर्टाच्या निर्णयाने आम्ही निराश झालो आहोत. व्हॉट्सअॅपवर अनेक यूजर्स अवलंबून आहेत, असे व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅन काऊमने सांगितले. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गनेही याबाबत पोस्ट करुन निराशा व्यक्त केली.