मुंबई : भारतात 14 हजार रूपयात शाओमीच्या मी 3 फोनला यश मिळाल्यानंतर, शाओमीने 5 हजार 999 रूपयात शाओमी रेडमी 1S लॉन्च केला आहे.
शाओमीचा हा फोन कमी किमतीत येणाऱ्या स्मार्टफोनला धक्का देणारा आहे का याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. शाओमी रेडमी 1S मध्ये 720x1280 पिक्सल रिझोल्यूशनचा 4.7 इंच एचडी डिस्प्ले आहे.
5 हजार 999 रूपयाच्या या स्मार्टफोनवर एक असा फीचर आहे, तो इतर फोनमध्ये असेल असं वाटत नाही. शाओमी रेडमी 1S मध्ये 1.6 गीगाहर्टझ क्वॉड-कोर क्वॉलकॉम प्रोसेसर, एक जीबी रॅम आणि एड्रीनो 305 जीपीयू आहे. यात डिस्प्लेमध्ये ड्रॅगनटेल ग्लास प्रोटेक्शनचा वापर करण्यात आला आहे.
शाओमी रेडमी च्या मागे एक बीएसआय सेन्सरसोबत 8 मेगापिक्सलचा कॅमेरा लावण्यात आला आहे. या कॅमेऱ्यात 1080P व्हिडीओ शूट करता येऊ शकतो. या फोनला 1.6 चा फ्रंट कॅमेरा आहे.
शाओमी रेडमी 1S मध्ये 8 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 64 जीबी पर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावता येऊ शकतं. शाओमी रेडमी मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. या फोनची बॅटरी 2000mAh आहे
शाओमी रेडमी 1S च्या कनेक्टीविटी ऑप्शन्समध्ये जीपीआरएस,एज, 3जी, जीपीएस, वायफाय आणि ब्लूटूथ 4.0 सामिल आहे. या फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन साईट फ्लिपकार्टवर जावं लागेल आणि रजिस्ट्रेशन करावं लागेल, या फोनची विक्री 2 सप्टेंबरपासून आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.