मुंबई : सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत झुकरबर्ग हे नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. झुकरबर्ग ९ आणि १० ऑक्टोबरमध्ये भारतात आयोजित इंटरनेट डॉट ओआरजी समिटमध्ये भाग घेणार आहेत. हे समिट इंटरनेटच्या प्रसारासाठी घेण्यात येत.पण नरेंद्र मोदी यांना जेव्हा झुकरबर्ग भेटेल तेव्हा त्यांच्या एजंड्यावर काय असू शकतं. पाहा पाच महत्वाचे मुद्दे
१) इंटरनेटच्या प्रसारात भागेदारी
सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त आतापर्यंत साडेबारा टक्के लोकांजवळ इंटरनेट सेवा आहे.
नरेंद्र मोदीने सरकारच्या आपल्या व्हिजनमध्ये इंटरनेटच्या प्रसारास प्राधान्य दिलं आहे.
२) शिक्षण आणि ई-गव्हर्नन्स
काही महिन्याआधी आपल्या भारत यात्रेत फेसबुकचे सीओओ शेरिल सँडबर्गने म्हटलं होतं, कंपनीसाठी भारतात मोठा स्कोप आहे. भारतात शिक्षण, आरोग्य आणि काही सेवा क्षेत्रांमध्ये सरकारसोबत मिळून रचनात्मक काम करता येऊ शकतं. झुकरबर्ग या गोष्टी आपल्या अजेंड्यावर पुन्हा एकदा घेऊ शकतो.
३) टॅक्स सेवेत आणि पारदर्शकता
भारतात व्यापार करणं आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी एवढं सोपं नाही. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार सापी व्यापार व्यवस्था असणाऱ्या देशात भारतात १३४ व्या क्रमांकावर आहे.
नोकिया आणि वोडाफोन भारतीय टॅक्स व्यवस्थेशी लढतांना दिसून येत आहेत. नुकतंच दिल्ली हायकोर्टाने फेसबुकवर योग्य टॅक्स जमा न करण्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
४) फेसबुककडून गोपनीय माहितीची मागणी
भारताने २०१३ मध्ये म्हणजे यूपीए सरकारच्या काळात, फेसबुककडून ६ हजार ८४३ वेळा गोपनीय माहिती मागितली आहे, ही माहिती अनेक मोठ्या देशांशी संबंधित आहे.गुगलकडून सर्वात जास्त माहिती मागणाऱ्या देशांमध्ये भारत आहे, भारत पाचव्या क्रमांकावर आहे. या विषयी झुकरबर्ग आपली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडू शकतो.
५) फेसबुक लाईक आणि कमेन्टसने जेल
काही महिन्यांपासून भारतीय आयटी कायद्यांतर्गत फेसबुक युझर्सना कथित आक्षेपार्ह कमेन्ट करणे, किंवा लाईक करणे, या आरोपावरून जेलची हवा खावी लागली आहे. खरंतर आक्षेपार्ह काय आहे, याचं खरं स्वरूप अजून स्पष्ट झालेलं नाही, झुकरबर्ग या संदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.