...तर तुमची मुलं ही आईनस्टाईन! 7 लक्षणांवरुन ओळखा

ही लक्षणे सांगतात तुमच्या मुलात दडलाय स्पेशल टॅलेंट 

| Dec 15, 2024, 16:08 PM IST

प्रत्येक मुलं वेगळं असतं अगदी तसंच त्यांमधील कलागुण वेगळे असतात. मुलांमधील हुशारी ओळखणे ही पालकांची जबाबदारी आहे. इथे आम्ही 7 संकेत तुम्हाला सांगणार आहोत, जी तुमचं मुलं सामान्य नसल्याचं सांगतात. ही मुलं अति हुशार असून भविष्यात नक्कीच टॉपला जातील यात शंक नाही. 

1/8

सर्जनशील विचार

तुमच मुलं आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतं असेल तर त्याच्या कलागुणांना वाव द्या. कोणत्याही समस्येवर तुमच्या मुलाला हटके विचार सुचत असतील, तर या गुणांना वाव द्या. नवनवीन विचार करायला प्रोत्साहित करा.   

2/8

भन्नाट स्मरणशक्ती

जर तुमच्या मुलाकडे अद्वितीय स्मरणशक्ती असेल तर त्याचा हा स्वभाव ओळखा. त्या मुलाच्या फक्त लक्षात राहत नाही. त्यामागची पुढची आठवण लक्षात राहत असेल. तसेच तुमचं मुलं तुम्हाला त्या कार्यक्रमाची इंतभुत माहिती सांगत असेल तर ही अजिबातच सामान्य बाब नाही. कमी वयात असलेल्या या गुणाला योग्य तो सपोर्ट करा. 

3/8

स्वयम प्रेरित

जर तुमचं मुलं फक्त स्वावलंबीच नाही तर तो स्वयम प्रेरित असेल तर हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही टास्कला तो सहज सोडवत असेल तर हे अलौकिक आहे. या त्याला गुणावर आणखी काम करा. तो कोणतंही काम करताना आपली आपली प्रोसेस आनंदाने करत असेल तर तुमच्या मुलामध्ये हा नक्कीच वेगळा गुण आहे. 

4/8

जलद होणारा विकास

काही मुलं ही खरंच निसर्गाचा चमत्कार असतो. यामुलांमध्ये होणारा सकारात्मक बदल अतिशय आकर्षित करणारा आहे. जसे की, मुलांचे मोटर स्किल्स, कॉगनेटिव डेव्हलम्पेंट आणि भाषेवर असलेलं प्रभुत्व नक्कीच तुम्हाला सकारात्मक बनवते. मुलांमधील हा गुण ओळखून नक्कीच काळजी घेणे आवश्यक आहे. 

5/8

एकपाठी

काही मुलं ही अक्षरशः एकपाठी असतात. या मुलांमध्ये स्मरणशक्ती इतकी सर्वोत्तम असते की, तुम्ही चकित व्हाल. या मुलांमध्ये कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते. तसेच यांना एकदा सांगितलेली गोष्ट लगेच लक्षात राहते. 

6/8

पराकोटीची उत्सुकता

या मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता सर्वाधिक असते. त्यामुळे या मुलांमध्ये पराकोटीची उत्सुकता असते. सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचा उत्साह दाणगा असतो. ही मुलं नवीन गोष्ट शिकण्यास कायम तयार असतात. 

7/8

संवेदनशील

तुमच्या मुलांमध्ये संवेदनशील गुण सर्वाधिक असतात. मुलांमधील या गुणांमुळे सहिष्णुता, संवेदनशीलता हे गुण असतात. आजूबाजूच्या मुलांमध्ये हे गुण अधिक असतात. या मुलांमध्ये प्रेमभावना अधिक असते. 

8/8

प्रॉब्लेमवर काढतात उपाय

या मुलांमध्ये कोणताही प्रश्न सोडवण्याची एक वेगळी कसब आहे. ही मुले शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच इतर गोष्टींमध्ये देखील अग्रगण्य असतील.