पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खास मॅसेज, पोस्ट आणि स्टेटस

महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे. भारतीय इतिहासातील उत्कृष्ठ महिला शासकांपैकी एक अहिल्याबाईंना होळकर यांना पाहिले जाते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन. 

| May 31, 2024, 11:56 AM IST

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725  रोजी जन्म झाला. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता. ज्या काळात स्त्रियांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, तेव्हा अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं. अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

1/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

घाट, मंदिरे, विहिरी बांधल्या, समान तिला रंक नि राव, लोकांसाठी देह झिजवी, अहिल्याबाई होळकर तिचे नाव.. 

2/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

लोककल्याणकारी राणी अहिल्या, राज्यकारभारात तरबेज होत्या, दीन-दुबळ्यांसाठी आईसमान, तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या.. 

3/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले, ही वीर रणरागिनी झाली, ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली.. 

4/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता, कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता..  

5/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

घडविले जे जे आपण, करावे त्याचे रक्षण, बाणेदारपणे उत्तर देणाऱ्या, अहिल्याबाई ना त्रिवार वंदन.. 

6/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले, ही वीर रणरागिनी झाली, ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली..

7/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

असंख्य राण्या झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणी नाही, गर्व जिचा आहे मराठी हृदयाला, एकच ती महाराणी, अहिल्यादेवी होळकर झाली..  

8/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले-मंदिरांचे, घडविले जिने नव्या हिंदुस्तानाला, नमन त्या अहिल्यादेवीला..  

9/9

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi

इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती, राणी असूनही वेगळी जिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती..