Relationship Tips: वडील आणि मुलीमध्ये घट्ट नातं असल्याचं म्हटलं जातं. त्याप्रमाणे वडील आणि मुलाचं नातं देखील खूप मजबूत असतं. मुलगा जन्माला आला की वडिलांना आनंद होतो, आपला सोबती, आपल्या पावलावर पाऊल टाकून चालणारा कोणीतरी या जगात आला आहे,अशी भावना त्यांच्या मनात येते. मुलगा लहान वयात वडिलांना आपला आदर्श मानतो.
मात्र, जसजसा तो मोठा होऊ लागतो तसतसे त्याचे वडिलांपासूनचे अंतरही वाढू लागते. अनेकदा इच्छा नसतानाही वडील आणि मुलामध्ये अंतर निर्माण होऊ लागते आणि मतभेद वाढतात,असे होऊ लागते. या वाढत्या अंतरांमुळे नाती तुटतात आणि भविष्य उध्वस्त होतात.
दोघांच्या स्वभावातील फरक
वडिलांचं प्रमाणापेक्षा जास्त कठोर असणं
मुलांकडून वडिलांच्या सूचनांचे पालन करण्यास नकार
दोन पिढ्यांतील अंतर
अभिमान किंवा अहंकार
एकमेकांसाठी वेळ नाही
संवादाचा अभाव
वडीलांकडून मुलांची इतर मुलांशी तुलना करणे
दोघांच्यातील अंतर आणि फरक कमी करण्यासाठी काय करावे?
वडील आणि मुलाचे विचार भिन्न असू शकतात हे मान्य करा. त्यामुळेच एकमेकांच्या बोलण्याला अजिबात हरकत घेऊ नये. जर तुम्हाला काही बरोबर वाटत नसेल तर त्यांना बसून समजावून सांगा.
सर्वप्रथम वडील आणि मुलामध्ये मनमोकळेपणाने संवाद साधण्याचा प्रयत्न करा. वेळ काढा. जेणेकरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकाल. आपल्या सर्व भावना शेअर करा.
वडील आणि मुलाच्या वादाचे कारण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांपासून दुरावण्याचे कारण जाणून घेतल्यास ते सोडवले जाऊ शकते. एखाद्या विषयावर एकमेकांचे मत पटत नसेल तर त्यांनी वाद कमी करावा.
वडील आणि मुलगा दोघांनाही आवडणारा एक छंद शोधा. एकत्र एन्जॉय करणे आणि गेम खेळणे त्यांच्यातील बॉन्डिंग वाढवू शकते.
एकमेकांना आधार द्या आणि परस्पर समज वाढवण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा मुलगा अडचणीत आला किंवा चूक झाली तर त्याला शिव्या देण्याऐवजी त्याला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची आणि चांगल्या कृत्यांची प्रशंसा करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा अभिमान आहे. लक्षात ठेवा की सुखी कुटुंब टिकवायचे असेल तर नातेसंबंध वेळेत सुधारले पाहिजेत.