Lemon Astro Benefits:आपल्याकडे लांबच्या प्रवासाला निघताना वाहनाखाली लिंबू चिरडण्याची प्रथा आहे. घरात नवीन वाहन खरेदी केल्यावरही ते चालवायच्या अगोदर चाकाखाली लिंबू ठेवून तो चिरडला जातो आणि मगचं गाडी चालवली जाते. पण तुम्हाला माहित आहे का ज्योतिषशास्त्र लिंबाचा वापर का केला जातो, लिंबू गाडीच्या चाकाखाली का ठेवतात ? चला तर मग याबद्दल जाणून घेऊया.
गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवून का चिरडतात ?
चाकाखाली लिंबू चिरडल्यानं
आजूबाजूची नकारात्मकता नष्ट होते. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की येणार संकट टळलं जातं. नवीन गाडीवर कोणतही संकट येऊ नये म्हणून गाडीखाली लिंबू ठेवून चिरडला जातो. यामुळे प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतो.
अशी प्रथा का पडली?
पूर्वीच्या काळात व्यापारासाठी दळणवळण मोठ्या प्रमाणात व्हायचं. व्यापाराच्या वाहतुकीसाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्राण्यांचा वापर करायचे .अशावेळी प्रवासादरम्यान प्राण्यांना संसर्ग होऊन काही जीवाणू प्राण्यांच्या पायांमध्ये (खाली) शिरतात, आणि मग प्राण्यांना संसर्ग होऊन कधी-कधी मृत्यू व्हायचा. यावरचं उपाय म्हणून पूर्वीच्या काळी लांबच्या प्रवासाला निघताना प्राण्यांच्या पायाखाली लिंबू चिरडला जायचा. लिंबू हा सर्व जीवाणूंसाठी औषध आहे यातील सॅट्रिक असिड सर्व प्रकारचे जीवाणू नष्ट करण्यास मदत करतं. पूर्वीपासूनच प्रथोमचारात लिंबूचा समावेश केला आहे. हीच प्रथा चालत येऊन पुढे वाहतुकीची साधन बदलली असली तरी लिंबू हे शास्त्रानुसार खूप उपयुक्त आहे हे लक्षात घेतलं आहे. आणि आजही लांब प्रवासाला निघताना गाडीखाली लिंबू चिरडला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)