Diwali 2022 Date: शारदीय नवरात्रोत्सवाची (Navratra 2022) धुमधडाक्यात सुरुवात झालेली असतानाच आता अवघ्या काही दिवसांनी दसराही (Dusshera) येऊन ठेपणार आहे. त्यानंतर मागोमागच दिवाळीचे वेधही आलेच. यंदाच्या वर्षी 24 ऑक्टोबरला (October) संपूर्ण जग दिवाळी साजरा करणार आहे. यानंतर दोन दिवसांनीच एक महत्त्वपूर्ण गोचर घडून येणार आहे.
26 ऑक्टोबर 2022 ला बुध गोचर (Diwali 2022 ) करत तुळ राशीत प्रवेश करणार आहे. याचा थेट सकारात्मक परिणाम ज्या राशींवर पडेल, त्या राशींना अडचणींपासून मुक्त होण्याची संधी मिळणार आहे. सोबतच लक्ष्मीची कृपा झाल्यामुळं या राशींना आर्थिक दिलासाही मिळणार आहे.
मिथुन- दिवाळीनंतर बुध गोचर मिथुन राशीच्या समस्या संपवणार आहे. अर्थार्जनाच्या नव्या संधी त्यांना मिळणार आहेत. नोकरीच्या नव्या संधी मिळतील.
कर्क- बुध राशी परिवर्तनामुळ कर्क राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे. पैशांअभावी त्यांची जी कामं थांबली होती, ती आता मार्गी लागणार आहेत. कुटुंबात सुखशांती नांदणार आहे.
सिंह- बुध गोचरामुळे फायदा होणार आहे. नातेसंबंध सुधारतील. कुटुंबात सुखशांती नांदेल. कामकाजात फायदा होईल.
धनु- बुधाचं तुळ राशीच प्रवेश करणं धनु राशीसाठी फायद्याचं असेल. अडकलेले पैसे परत मिळतील. ताटकळणाऱ्या योजना मार्गी लागतील.
मकर- मकर राशीसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. प्रगतीपथावर वाटचाल कराल. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. व्यवसाय वाढेल.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)