Jupiter Transits 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह वेळोवेळी राशिचक्र आणि नक्षत्र बदल करतात. यावेळी ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. यावेळी 13 जून रोजी गुरु ग्रहाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे.
गुरु ग्रह आधीच शुक्र वृषभ राशीत गोचर केलं आहे. त्यामुळे गुरु शुक्राच्या नक्षत्रात गोचर करत आहे. अशा स्थितीत बृहस्पति राशीतील बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
गुरूचे नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल आणि धनसंचय वाढेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जे व्यावसायिक आहेत त्यांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील.
बृहस्पति नक्षत्रातील बदल अनुकूल ठरू शकतात. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तुमची कार्यशैली सुधारेल. तसेच नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. आरोग्यही चांगले राहणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची आशा आहे. अनेक दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेली तेढ आता संपुष्टात येऊ शकते.
गुरूचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष यश मिळेल. यावेळी तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक आत्मविश्वास वाढवाल. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. एकाग्रता आणि बुद्धिमत्ता तीक्ष्ण असेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )