Gajkesari Yog: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं. दरवर्षी याची सुरुवात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीने होते, जी पौर्णिमेला संपते. या काळात शंकराची उपासना करण्यासोबतच व्रत पाळण्याचा विधी आहे. हा महिना भगवान शंकराला अतिशय प्रिय मानला जातो. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी सावन महिन्यात अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत. सावन महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवपंचम योग तयार होत असताना, सावनच्या मध्यावर शक्तिशाली गजकेसरी राजयोग तयार होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना अपार यशासोबतच मोठा लाभ मिळू शकणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरूचा संयोग होतो तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. श्रावण महिन्यात म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 4:45 वाजता चंद्र मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 1 ऑगस्ट रोजी रात्री 10:15 पर्यंत या राशीत राहणार आहे. यानंतर मिथुन राशीत प्रवेश करणार आङे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार होणार असून कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते पाहूया.
या राशीच्या चढत्या घरात गजकेसरी राजयोग तयार होत आहे. एखाद्याला दिलेले कर्ज परत मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. गजकेसरी योग व्यवसायासाठीही लाभदायक ठरू शकतो. नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या नफ्यासह पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात.
या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग केवळ आनंद घेऊन येणार आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुम्हाला वरिष्ठ लोक आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. या राशीच्या लोकांना भरपूर नफा मिळणार आहे. यासोबतच तुमचे उत्पन्न वाढेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असं करणं फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )