Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी! फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, फाग, कामदहन आणि फाल्गुनोत्सव अशा विविध नावाने ओळखला जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून वंत ऋतू सुरु होतो म्हणून याला वसंतोत्सव असंही म्हटलं जातं. मतभेद विसरून एकाच रंगांत न्हाऊन निघणारा हा सण नेमका कधी आहे. यंदा होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करता येणार का? जाणून घ्या धर्मशास्त्र काय सांगतं. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा होळीचा सण साजरा करण्यात येतो.
(Holi 2024 Date When is Holi and Dhulivandan Know the auspicious timings and puja rituals as lunar eclipse is shadowy)
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 24 मार्चला सकाळी 9:54 वाजता सुरू होणार असून 25 मार्चला दुपारी 12:29 वाजेपर्यंत असणार आहे. अशा वेळी धर्मशास्त्रानुसार उदय तिथीनुसार होलिका दहन 24 मार्चला असणार आहे. यादिवशी महाराष्ट्रात घरोघरी नैवेद्य म्हणून पुरण पोळी बनवली जाते. तर 25 मार्चला रंगांची उधळण करण्यात येणार आहे. याला धुलिवंदन तर काही ठिकाणी धुळवड असंही म्हटलं जातं. तर महाराष्ट्रात काही भागात रंगांची उधळण ही रंगपंचमीला करण्यात येते. कोकणात होळीपासून 15 दिवस शिमग्याचा उत्सव साजरा करण्यात येतो.
पंचांगानुसार 24 मार्च 2024 ला रात्री 11.31 वाजेपासून रात्री 12.27 वाजेपर्यंत पूजा करता येणार आहे. यंदा होलिका दहन पूजेसाठी 1 तास 14 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.
कच्चा कापूस, अखंड, गूळ, फुलं, हार, रोळी, गुलाल, हळद, भांड्यात पाणी, नारळ, बताशा, गव्हाचं झुमके, ऊस इत्यादी गोष्टी लागतात. साधणारण वेगवेगळ्या ठिकाणी या साहित्यात परंपरेनुसार काही बदल असतात.
होलिकासाठी मंत्र : ओम होलिकाय नम:
भक्त प्रल्हादासाठी मंत्र : ओम प्रल्हादाय नम:
भगवान नरसिंहासाठी मंत्र : ओम नृसिंहाय नम:
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)