Horoscope 3 January 2024 : आज जवळच्या व्यक्तीला दुखवू नका; पाहा मेषपासून मीनपर्यंत प्रत्येक राशीचं भविष्य

Horoscope 3 January 2024 : दैनंदिन राशीभविष्यामध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी तुम्हाला सतर्क करतात. तर, काही गोष्टी तुम्हाला योग्य मार्गावर नेतात. पाहा आजचं राशीभविष्य काय सांगतं...   

सायली पाटील | Updated: Jan 3, 2024, 07:28 AM IST
Horoscope 3 January 2024 : आज जवळच्या व्यक्तीला दुखवू नका; पाहा मेषपासून मीनपर्यंत प्रत्येक राशीचं भविष्य  title=
Horoscope 3 January 2024 daily astro in marathi

Horoscope 3 January 2024 : पाहा राशीभविष्य आणि ज्योतिषविद्येनुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस 

मेष (Aries)- कमी प्राधान्याच्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. वर्तमानात जगण्याता प्रयत्न करा. मित्रांचे सल्ले विचारात घ्या. एखाद्या नवाय भूखंड व्यवहाराचा विचार तुम्ही कराल.

वृषभ (Taurus)- आज एखाद्या कामासाठी अपेक्षेहून जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. तरुणाईसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. नव्यानं काही गोष्टी कळणार आहेत. 

मिथुन (Gemini)- विद्यार्थीअवस्थेत असणाऱ्यांसाठी आज नव्या संधी चालून येणार आहेत. परिश्रम करण्यासाठी तयार राहा फळ तुमच्यात बाजूनं असेल. दाम्पत्यांना संतानसुख मिळणार आहे. 

कर्क (Cancer)- आज तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला असा काही सल्ला देईल की, आयुष्य पालटणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद फळणार आहेत.

सिंह (Leo)- तुमच्या करिअरबबातच्या निर्णयांमध्ये गोपनीयता राखा. संवेदनशील निर्णयांची वाच्यता सर्वांपुढं करु नका. पदोन्नतीची संधी आहे. प्रयत्न करत राहा. 

कन्या (Virgo)- नोकरीच्या ठिकाणी तुम्हाच्या कार्यक्षमतेची परीक्षा आहे आणि ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणार आहात. फक्त समर्पकता आणि एककेंद्री वृत्ती बाळगा. 

तूळ (Libra)- आज कोणत्याही वादामध्ये अडकू नका. इतरांची मदत करा. आरोग्याची काळजी घ्या. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा. 

वृश्चिक (Scorpio)- करिअरमध्ये आज एखादी वेगळी वाट निवडू शकता. नोकरीची नवी आणि तितकीच मोठी संधी चालून येणार आहे. कुटुंबाला वेळ द्या. 

धनु (Sagittarius)- नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्या कामाचा आदर्श इतरांपुढं ठेवला जाणार आहे. व्यवहार स्पष्ट ठेवा. आज जवळच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. 

मकर (Capricorn)- आज तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये सक्रीय असाल. एखाद्या परदेशवारीचा बेत आखण्यामध्ये सहभागी व्हाल. आज जुने मित्र भेटतील. घरातील वाट मिटण्याची शक्यता आहे. 

कुंभ (Aquarius)- आज प्रतिस्पर्धींपासून सावध राहा, तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. धैर्यानं पुढे जा, सकारात्मक विचारसरणी बाळगा. 

मीन (Pisces)- आज कामाचा ताण जरा जास्त असेल, पण लक्ष्य विसरुन चालणार नाही. आज कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल, घर नातेवाईकांनी खुलून जाईल. 

(वरील माहिती ज्योतिषातील संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)