मुंबई: हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तर नवीन वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. या दरम्यान अनेक ग्रह आपली दिशा बदलत आहेत. त्याचा परिणाम 12 राशींवर होत आहे. ज्योतिषशास्त्रात राशी चार घटकांमध्ये ठेवल्या आहेत.
काही राशींचे ग्रह खूप चांगले असतात. त्यांच्या आयुष्य़ात अनेक समस्य़ा येऊनही आर्थिक चणचण किंवा पैशांची उणीव फार काळ भासत नाही. आज अशा राशीच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. या 3 राशींवर कायम शनिदेवही प्रसन्न असतो.
वृषभ : या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांचा चंद्रमा खूप जास्त मजबूत आहे. या राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचाही प्रभाव आहे. शुक्र आणि बुध यांचा प्रभाव असल्याने हे लोक साहसी असतात. आत्मविश्वास या लोकांमध्ये भरलेला असतो. धन आणि आर्थिक स्थिती खूप चांगली असते. या लोकांचा स्वभाव थोडा रागीटही असतो. तसेच हे लोक खूप जिद्दी असतात.
कन्या : बुध हा कन्या राशीचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांमध्ये धूर्त, वक्तृत्व आणि व्यवस्थापन कौशल्ये या गोष्टीनं परिपूर्ण असतात. याशिवाय या राशीचे लोक पैशाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे असतात. स्वार्थी प्रवृत्ती ही या राशीची सर्वात मोठी कमजोरी आहे.
कन्या रास या राशीच्या लोकांसाठी ओपल किंवा हिरा घालणं शुभ मानलं जातं. या राशीच्या लोकांचं लगेच इगो दुखावला जातो. त्यामुळे त्यांच्यासोबत फार जपून वागावं लागतं.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि आहे. या राशीत बुध मजबूत राहतो. या राशीचे लोक बुद्धिमान असतात. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली या राशीचे लोक संधीसाधू, धूर्त आणि श्रीमंत असतात.त्याच वेळी, या राशीच्या लोकांमध्ये अहंकार ही सर्वात मोठी कमजोरी आहे.
याशिवाय मकर राशीचे लोक त्यांच्या विषयात निपुण असतात.या राशीच्या लोकांनी सूर्याची उपासना करणं महत्त्वाचं मानलं जातं.